बोदवड: काँग्रेस प्रांताध्यक्षनामदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष संदीपजी भैया पाटील यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषी कायद्याचा विरोधात शनिवारी जामठी येथील बाजारामध्ये केंद्र सरकारने पास केलेल्या तीन शेतकरी अधिनियम बिला विरोधात शेतकरी यांच्या सह्याची मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत जामठी, येवती, शेलवड, लोणवाडी, धोंनखेडा, मनूर, मुक्तड, वाकी इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या अभियाना अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भारतीय राष्टीय काँग्रेस स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून 2 कोटी स्वाक्षरीचे लक्ष काँग्रेस पूर्ण करून संपूर्ण देशभरातून आलेल्या स्वाक्षरी महामहिम राष्ट्रपती यांना देऊन केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी 3 कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सदर कायद्यामुळे शेतीही भांडवलदारांच्या ताब्यात जाणार आहे. कंत्राटी शेती कायद्यामुळे धनदांडग्या कृषी उद्योगपतींचा मनमानीपणा वाढेल त्यामुळे जो पर्यंत हा काळा कायदा रद्द होनार नाही तोपर्यंत काँग्रेस शेतकऱ्यांसाठी आक्रमक पणे लढत राहील : जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील
या कार्यक्रमाला उपस्थिती मध्ये युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील, माजी सभापती वीरेंद्रसिंग पाटील, तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, शहरध्यक्ष मेहबूब शेख, दिलीप सिंग पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, डॉ. सुधीर पाटील, इरफान शेख, बाळू पाटील, भरत पाटील, सागर पाटील, प्रकाश पाटील,असिफ शेख रेवती, ज्ञानेश्वर पाटील, पुंजाजी पाटील, सुभाष चौधरी, परमेश्वर टिकारे, नारायण घ्यार इत्यादी उपस्थित होते.