जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आल्याचं खुद्द त्यांनीच माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली.
फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी… मी स्वतःला आयसोलेट केले आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतो आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.
हे केलं अवाहन…
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असं अवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संपर्कात आलेल्याना केले आहे. तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असं अवाहन देखील केले आहे.