माजी मंत्रि एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर ट्विटर वर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी ट्विट करत म्हणाले की राज्याचे जेष्ठ नेते एकनाथरावजी खडसे यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनापासून स्वागत करतो, खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.
तसेच खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. आपल्या जेष्ठत्वाचा,अनुभवाचा निश्चित सन्मान होईल असा विश्वास देतो. असं म्हटलं आहे.
तब्बेतीच्या कारणामुळे अजित पवार यांनी कालच्या खडसे यांच्या पक्षप्रवेशाला गैरहजर राहिल्याने अजित पवार नाराज असल्याचे बोललं जातं होत मात्र शरद पवार यांनी नाराजी वगैरे नसल्याचे कालच स्पष्ट केले होते. मात्र अजित पवार यांनी ट्विट करून खडसेंच्या प्रवेशाचे स्वागत करत जेष्ठत्वाचा व अनुभवाचा सन्मान होईल याचा विश्वास देखील दिला आहे.