मुंबई (वृत्तसंस्था) मला अनेक जण म्हणायचे तुम्ही पक्ष सोडला तर तर इडी तुमच्या मागे लावतील. त्यामुळे त्यांनी’ ईडी लावली तर मी सीडी लावेल, असा कडक इशारा खडसे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावेळी भाजपला अप्रत्यक्षरित्या दिला.
आज मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित खडसे यांनी पक्ष प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, सलग चाळीस वर्ष पक्षाची सेवा केल्यावर देखील माझ्यावर अन्याय झाला… मला छळण्यात आलं. बाईला पुढे करून माझ्यावर खोटे विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला त्यामुळे आता अशांसोबत काम करणं शक्य नसल्याने आपण राष्ट्रवादी प्रवेश केला असून यापुढील काळात पक्षासाठी ताकदीनं काम करून दाखवेल असा शब्द देतो असं म्हणाले तर ज्या भूखंडाचा खोटे आरोप लावून मला बदनाम केले आता कोणी किती भूखंड घेतले हे यापुढे सर्वांच्या समोर येईलच असंही खडसे यावेळी म्हणाले.