कर्जत/लोभेवाडी/मोतीराम पादिर,
गेल्या पंचवीस ते तीस वर्षे मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे परंतु आज दिनांक 21/ 10/ 2020 रोजी रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा आरोग्य, शिक्षण व क्रीडा सभापती सुधाकरजी घारे (भाऊ) यांनी आज कर्जत तालुक्यामध्ये जवळपास साडे 2 कोटींच्या विकास कामांचे कार्यादेशाचे (वर्कऑर्डर) चे वाटप करण्यात आले आणि विशेष बाब म्हणजे गेल्या पंचवीस ते तीस वर्षातील ही पहिलीच घटना असेल की तालुक्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष फोन करून बोलावून घेऊन त्या-त्या विभागातील वाड्या वस्त्यांवरील आदिवासी कार्यकर्त्यांना विकासकामांचे कार्यादेश देण्यात आले शिवाय रायगड जिल्हा परिषदेमधील अनुकंपा तत्त्वावरील जी नोकरभरती झाली त्यामध्ये सुद्धा कर्जत तालुक्यातील 8 आदिवासी उमेदवारांना नोकरीची संधी दिली सुधाकर भाऊंच्या या अशा अनेक ऐतिहासिक निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये खूपच समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जातात.