गौरवकुमार पाटील / अमळनेर – येथून जवळच असलेल्या शहापूर गावी तांदळी रस्त्यावर कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार खेळवितांना एकास पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली असून त्याचे ताब्यातील २० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत माहिती अशी की शहापूर गावी तांदळी रस्त्यावर कल्याण मटका नावाचा जुगाराचा सट्टा खेळविण्यात येत असल्याची गुप्त माहिती एपीआय राहुल फुला यांना मिळल्यावरून काल दिनांक २१ रोजी सायंकाळी हवालदार भास्कर चव्हाण ,पोलीस नाईक फिरोज बागवान, सचिन निकम,सुनील तेली ,होमगार्ड सुरेश पवार , संभाजी पाटील यांच्या पथकाने शहापूर व तांदळी गावचे मधून तांदळी रस्त्यावर सापळा रचून मोटारसायकल वर संभाजी महारु पाटील हा इसम कल्याण मटका नावाचे आकडे लिहितांना दिसल्याने सुनील तेली यांनी त्याचे जवळ जाताच त्याने मोटारसायकल व साहित्य सोडून पळ काढला मात्र त्याचा सचिन निकम ,फिरोज बागवान यांनी पकडले व त्याचे जवळ १८०० रुपये रोख व कल्याण मटका जुगाराचे आकडे लिहिण्याचे साहित्य रंगेहाथ मिळून आले व त्याचे ताब्यातील १९ हजार रुपये किमतीची जुनी मोटारसायकल क्रमांक एमएच १५-एल ३७५८ ही लागलीच पंचांसमक्ष पंचनामा करून २० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत मारवड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सचिन निकम यांनी फिर्याद दिल्यावरून संभाजी महारु पाटील राहणार शहापूर याचे विरुद्ध सार्वजनिक जागी बेकायदा कल्याण नावाचा जुगार खेळणे व खळविणे आदी कायद्यात गुन्हा दाखल करून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.