पाचोरा- (प्रतिनिधी) -पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथील पर्यवेक्षिका प्रमिला पाटील या प्रदीर्घ सेवेनंतर दि. ३० रोजी बुधवारी सेवा निवृत्त झाल्या. त्यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळा कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी अध्यक्ष स्थानी होते. प्रमिला पाटील यांचा विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. प्रल्हादराव पाटील, सिध्दीविनायक हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, ग्रीष्मा पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, तांत्रिक व किमान कौशल्य विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, सौ. एस. टी. पाटील तसेच डॉ. पाटील दाम्पत्य यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन बी. एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एन. आर. ठाकरे यांनी केले. शासन नियमानुसार सोहळा संपन्न झाला.