महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्व. बाबा शिंगोटे यांना 2018 साली पुणे, आळंदी येथे राज्यस्तरीय अधिवेशनात जव्हारलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार देतानाचा एक क्षण…
मुंबई । प्रतिनिधी । छोट्या खेडे गावातून आलेल्या पुण्यभूषण मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पुण्यनगरी या लोकप्रिय वृत्तपत्रासह मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषेत सुरू केली वृत्तपत्रे मोठी लोकप्रिय ठरली आहे. वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत निर्भीड पत्रकारिता करणारे वृत्तपत्र क्षेत्रातील महर्षी स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील आधारवड हरपला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक तथा जेष्ठ पत्रकार तथा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते संजय भोकरे व्यक्त केली आहे .
जेष्ठ पत्रकार व पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत संजय भोकरे बोलत होते. स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी सारख्या छोट्या गावातून आपल्या कार्यास प्रारंभ केला. वेळप्रसंगी उपाशी राहून फुटपाथवर राहून त्यांनी दिवस काढले. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे मालक अशी त्यांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत साधी राहणी व उच्च विचार असलेल्या बाबांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात, कर्नाटक अशा विविध भाषांमधून आपली वृत्तपत्रे सुरु केली.
पुण्यनगरी, हिंदमाता, मुंबई चौफेर, वार्ताहर, कर्नाटक मल्ला ही त्यांची वृत्तपत्रे मोठी लोकप्रिय ठरली आहे.
वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत शिंगोटे बाबा यांनी राजयभर प्रवास करून हे वृत्तपत्र वाढवण्यात मोठे काम केले. अखेरपर्यंत निर्भीडपणे त्यांनी आपली लेखणी चालविली. ग्रामीण भागातून आलेल्या व कोणत्याही पत्रकारितेचा वारसा नसलेल्या या व्यक्तिमत्वाने पत्रकारिता क्षेत्रात अनेक नवीन पत्रकारांसाठी आधारवड म्हणून काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुणे जिल्हात जवाहरलाल दरडा जिवनगौरव पुरस्कार तिनं वर्षापुर्वी विजयबाबु दर्डा यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला होता.
पुण्यभूषण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार यां सह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ समीक्षक, संपादक व निर्भीड पत्रकार हरपला असून पत्रकारिता क्षेत्रातील महर्षी असलेल्या स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना ही भोकरे यांनी व्यक्त केली आहे.
तर प्रदेश अध्य्यक्ष वसंतराव मुंढे यांनी बोलताना सांगितले की प्रिंट मिडीयातील धिरुभाई अंबानी या नावाने बाबांनी आपला राज्यात पत्रकारांचा मोठा परीवार त्यांनी निर्माण करुन हजारो युवक पत्रकारांना व युवकांना रोजगार प्राप्त करून दिला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्व. शिंगोटे यांना आदरांजली अपर्ण करण्यात आली.
बाबा शिंगोटे यांचे आमचे नातेवाईक संबंध असल्यामुळे त्यांनी पत्रकार संघात काम करत असताना नेहमी पाठीवर हात ठेवला, तर ओतुर येथील वितरक एजन्सी त्यांची स्वतःची असल्याने इतर दैनिकांची पार्सल वाहतूक ते त्यांच्या गाडीतून नेत असत. यावेळी एका दैनिकाचा मालक, संपादक दुसर्या दैनिकाला मदत करताना वेगळाच आदर्श त्यांच्याकडून पहावयास मिळाला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दोन वेळा त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचे निमंत्रण देण्यासाठी मी ज्यावेळी त्यांचे निवासस्थान गायमुखवाडी याठिकाणी गेलो. त्यावेळी त्यांनी माझा सन्मान राज्य पत्रकार संघाच्यावतीने होतोय, त्यामुळे हजारो पत्रकार या व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नक्कीच राज्य पत्रकार संघामुळे एक संघटन उभे केले. त्या संघटनाच्या माध्यमातून मालकांचा देखील सन्मान करुन जो पायंडा या संघातील पदाधिकार्यांनी तो मला नेहमी आदरयुक्त वाटतो. आजपर्यंत बाबांबरोबर सुमारे 40 ते 45 वेळा संपर्क आला. नेहमी आपल्या भाषेत इतरांना देखील प्रेरणा देणारे व्यासपिठ आज आपल्यातून अचानक गेले. याचा वृत्तपत्र सृष्टीवर मोठा आघात झाला आहे.
-विश्वास आरोटे (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ)