जळगाव (प्रतिनिधी ) महसुल दिनानिमित्त जळगांव जिल्ह्यांतुन सन , २०१९ — २०२० या वर्षात महसुल प्रशासनातर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट कर्मचारी चा मान महसुल विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव योगेश अडकमोल यांना मिळाला. जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन सन्मानपत्र देवुन श्री योगेश अडकमोल यांना गौरविण्यात आले सत्कार सभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आला.
श्री योगेश अडकमोल हे शिपाई या पदावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सन २०१० ते २०११ ला कार्यालयीन शिपाई पदावर रुजु झाले आहेत. नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहणारे स्मित भाषी ,शेतकरी वर्ग व ईतर कोणाचेही काम त्याच्या कडे गेल्यावर त्यांना योग्य सल्ला व अधिकाऱ्यांची नम्रतेने वागून काम करण्याची पद्धत जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम त्वरीत करून देतात.