जळगाव, (विशेष प्रतिनिधी)- तालुक्यातील कानळदा शिवारातील गिरणा नदी पात्रातून सऱ्हास अवैध वाळू उपसा सुरु असल्याची ओरड आहे. गावातुन आमोद खुर्द जाणाऱ्या रोडच्या काँक्रटीकरणाचे काम देखील सुरु आहे.वाळू ठेके सुरु नसतांना याकामासाठी वाळू येते कुठून याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
कामाच्या ठिकाणी वाळूसाठा देखील केलेला आहेत तरी या वाळूसाठा बाबत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी व कानळदा शिवारातील गिरणा नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला थांबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.