जळगाव, (प्रतिनिधी)- महसुल दिनानिमित्त जळगांव जिल्ह्यांतुन सन , २०१९ — २०२० या वर्षात महसुल प्रशासनाने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट तलाठी म्हणून भडगांव येथिल महसुल विभागाचे टोणगांव { भडगांव } तलाठी राहुल गोविंदराव पवार यांना मिळाला.
जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी उत्कृष्ट तलाठी म्हणुन सन्मानपत्र देवुन राहुल गोविंदराव पवार यांना गौरविण्यात आले सत्कार सभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आला. राहुल पवार हे भडगांव महसुल विभागात येथे सन २०१८ मार्चला टोणगांव ( भडगांव ) तलाठी पदावर रुजु झाले आहेत नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहणारे स्मित भाषी ,शेतकरी वर्ग व ईतर कोणाचेही काम त्याच्या कडे गेल्यावर त्यांना योग्य सल्ला व त्यांचे काम त्वरीत करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल पवार. जिल्ह्याभरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.