क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा कारागृहात भरणा ; कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण
जळगाव ;- येथील कारागृहात पूर्णवेळ अधीक्षक लाभत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ‘प्रभारीराज’ असलयाने आणि कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांची संख्या असल्याने या याचा अतिरिक्त कामाचा ताण सध्या कर्मचाऱ्यांवर पडत असून त्यांचे ‘वांधे ‘ होत असल्याने नाराजी पसरली आहे. पूर्णवेळ अधीक्षक नेमावा अशी मागणी आता होत आहे .
जळगाव कारागृह या ना त्या कारणाने राज्यात गाजत आले आहे . वरिष्ठ तुरुंगाधिकारी बि. डी. श्रीराव यांच्या निलंबनानंतर नंदुरबारचे कारागृह अधीक्षक अनिल वांधेकर यांची जळगावच्या प्रभारी कारागृह अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात केवळ ‘प्रभारीराज ‘ सुरु असल्याने कर्मचाऱ्यांचीही कुचंबणा होताना दिसत आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी डीटी डाबेराव यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्याने त्यांचे पद हे रिक्त असून त्यांच्या निलंबनाच्या काळात त्यांचे वेतन जळगावच्या आस्थापनांमधून होत आहे. तसेच सध्याचे तुरुंगाधिकारी अनिल वांधेकर यांचीही नंदुरबार कारागृहात जागा रिक्त असल्याने प्रभारी नेमून कारभार चालविला जात असल्याने पूर्णवेळ अधिकारी नेमावा अशी मागणी कर्मचाऱयांकडून होत आहे. तसेच कारागृहात गेल्या एक वर्षांपासून कुठलीही सुधारणा झाली नसल्याचे चित्र असून क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांच्या संख्येमुळे कमी कर्मचारी संख्या असल्याने याचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांच्या कामावर पडत आहे. याकडे लक्ष देऊन कर्मचारी संख्या वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.