पाचोरा : ‘विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे’, ‘धनधान्य पिकू दे,सर्वांच्या हाताला काम दे’,आणि माझा पाचोरा-भडगाव तालुका सुखी संपन्न होऊ दे ,अशी प्रार्थना करण्यासाठी येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व माजी नगरपरिषद गटनेता अमोल शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पाचोरा ते खान्देशातील प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरे. पर्यंत पायी वारी करून समाजातील युवकांपुढे भक्तीभावाचा एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर समाजातील अध्यात्म भक्तीभाव व धार्मिक भावना जोपासणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांनी एक आगळा-वेगळा युवा नेता असल्याचे सिद्ध केले..
युवा नेते अमोल शिंदे यांनी केली पायी वारी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि. १२ जुलै रोजी पहाटे ७ वाजता पाचोरा कृष्णापुरी येथील नवीन विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीची मनोभावे पूजा करून पायी वारीला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे दीड हजार युवा वारकऱ्यांच्या सोबत वारी पिंपळगाव हरेश्वर कडे मार्गस्थ झाली. या वारीत अमोल शिंदे यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश शिंदे,पं.स.समिती सभापती बन्सीलाल पाटील, कृ.उ.बा.समिती उपसभापती ॲड. विश्वास भोसले,पं.स.सदस्या डॉ.अर्चना पाटील ( भडगाव ),कृ.उ.बा.समिती संचालक नरेंद्र पाटील , नगरसेवक विष्णू अहिरे ,माजी नगरसेवक ॲड.योगेश पाटील ,भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश पाटील ,सरपंच जारगाव सुनिल पाटील,डॉ. विशाल पाटील आदी मान्यवर या दिंडीत सहभागी झाले होते. विशेषत: महिला वारकऱ्यांची ही उपस्थिती लक्षणीय होती .