जळगाव, (प्रतिनिधी)- आरटीओ कार्यालयात करवसुली अधिकारी म्हणून सेवेत असलेले सी.एस.इंगळे यांना एकाने शिवीगाळ करत दिली धमकी दिल्या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करवसुली अधिकारी सी.एस.इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील यांच्या मालकीचे खाजगी वाहन क्र एम.एच.19 सी.यु.2727 वाहनावरील वाहन चालक अक्षय बोदडे याने शिवीगाळ करत धमकी दिली असून कार्यालयीन कामकाज करत असतांना माझ्या टेबलावर हात मारत टेबलावरचे रजिस्टर खाली फेकून दिले.तसेच खर्चायला देखील एक हजाराची मागणी केली न दिल्यास कार्यालयाबाहेर आल्यावर पाहून घेईल अशी धमकी दिली. या प्रकरणी अक्षय बोदडे यांच्या विरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनला भादवी कलम 353, 323, 504, 506, 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.