पारोळा : जैन धर्मीयांचा दि. १५ जुलैपासून सर्वत्र चातुर्मास सुरू होत आहे. यावेळी जैन मुनिश्री, माताजी, सतियाजी आदि तपस्वींचा मंगल विहार( पदयात्रा) थांबणार? आता तपस्वी ज्या स्थळी राहतील. त्या-त्या स्थळी वर्षा योग अर्थात चातुर्मास स्थापना करतील. चार महिने एकाच ठिकाणी वास्तव्य राहणार (जीव रक्षणासाठी) त्यास चातुर्मास अर्थात वरून योग म्हणतात. .
जैन समाजातील अग्रगण्य समजले जाणारे अध्यात्म सरोवर साऱ्या देशातील भक्तांचे लक्ष वेधून घेणारे श्रमण संस्कृतीचे आद्य कीर्तीवान महातपस्वी दिगंबराचार्य प. पू. विद्यासागर महामुनी श्री विशाल संघासहित नियमावर अतिशय क्षेत्र येथे तर खान्देशात त्यांचेच परमशिष्य परमपूज्य तपस्वी अक्षयसागर महाराज सहसंघाचे चातुर्मास पारोळा येथे होणार असल्याची माहिती खानदेश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतीश जैन यांनी दिली. चौमासा चातुर्मास हा चार महिने एकाच ठिकाणी थांबण्याचा कार्यक्रम नसून भाविकांना आपल्या आत्मबलास वाढविण्यासाठी एक उत्तम वेळ काळ आहे. जी तपस्या ती व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात करू शकत नाही. ती तपस्या ती त्या चातुर्मासात करते, जो अध्यात्म अभ्यास करतो तो इतर दिवशी करू शकत नाही तो अभ्यास तो या काळात करू शकतो आत्मिक तपस्या वृद्धिंगत करण्यासाठी वरून योग फार महत्त्वाची भूमिका बजावतो. युवक वर्ग व्यसनापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो, या चार महिन्याच्या काळात कालावधीने कालावधीत साधू महात्म्यांच्या सहवासात राहिल्याने अनेक जणांमध्ये ंपरिवर्तन घडून येते, असे परिवर्तन हजारो शिक्षक करू शकत नाही, ते परिवर्तन संत पुरुषांच्या संगतीत राहून काही क्षणातच घडून येते.