उदगीर (राहुल शिवणे)- कोवीड 19 बाबत आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरेन्स द्वारे दि.27 रोजी पार पडली. यावेळी जिल्ह्यांमध्ये करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना बद्दल आढावा घेण्यात आला असता लातूर जिल्हा परिषदेकडे सध्या असलेल्या ऍम्ब्युलन्स या 2005 या वर्षी खरेदी केलेल्या असून त्यां गाड्यांची मुदत संपलेली आहे. त्या गाड्या जवळजवळ निकामी होत आलेल्या आहेत. आरोग्य केंद्रांसाठी नवीन ॲम्बुलन्स ची आवश्यकता असल्यामुळे या बैठकीमध्ये covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापनासाठी 35 प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्या कडे केली आहे.
covid-19 आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन 2020-21 अंतर्गत जिल्ह्यामधील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना फोर्स ट्रॅक्स क्रुझर ॲम्बुलन्स ही उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे .
ह्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख, लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, लातुरचे महापाैर विक्रांतजी गाेजमगूडे,जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आदी उपस्थित होते.