१५कोटी १२ लाख ३ हजार ७७५ रूपयांची तडजोड
जळगाव : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी जळगाव जिल्हा व अंतर्गत असलेल्या तालुक्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विविध ४०७० खटले निकाली निघून एकूण १५कोटी १२ लाख ३ हजार ७७५ रूपयांची तडजोड करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा प्राधिकरण नवीदिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्दशानुसार आज दि. १३ रोजी जिल्हा व तालुका न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी ेवा प्राधिकरण यांचे संकल्प गीत वाजवण्यात येवुन लोकअदालतीची सुरूवात करण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार त्याचप्रमाणे शासनाचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाहन करून या अदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित ६८१ प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणांपैकी ३३८९ प्रकरणे ही निकाली झाली आहेत. लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे २५ एप्रिल २०१८ रोजी जळगाव येथील शिवकॉलनीजवळील राष्ट्रीय महामार्गावर नारायण बोरसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता.मयत हे खासगी कंपनीत कार्यरत होते..
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली,आई असे वारस होते.मोटार वाहन प्राधिकरणाकडे अपघाती मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई भरपाईसाठी २१९/१८ असे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणात आय सी आय सी आय लोम्बार्ड , जनरल इन्शुरन्स लि. व अन्य प्रतिवादी होते. लोक न्यायालयामध्ये आर.एन. हिवसे व पॅनल विधीज्ञ शरद न्यायदे यांचे समोर तडजोड होऊन रू. ३०, ५०,००० नुकसान भरपाई मयतांचे वारसास देण्याचे ठरले. अशा प्रकारचे अनेक प्रकरणे लोक न्यायालयामध्ये तडजोड झाल्याने दान्ही पक्षकारांचा वेळ पैसा व मानसिक त्रास वाचला. लोकअदालत प्रसंगी न्या. जी.ए. सानप ,जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश के.एच. ठोंबरे, जिल्हा सरकारी वकिल ॲड. केतन ढाके, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. पी.बी. चौधरी तसेच वकिल , कर्मचारी, पक्षकार हजर होते.