बोदवड – शहराची लोकसंख्या तसेच परिसरात वाढते जिनिंग अँड प्रेसिंग, ऑइल मिल यांचा विचार करून व बोदवड परिसर नेहमी दुष्काळी असल्याने नगरपंचायत ने अग्निशमन गाड्यांच्या मंगणीचा ठराव करून मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मंगणी निवेदनाद्वारे शांताराम कोळी यांच्याकडून नगरपंचायतिचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले व नगराध्यक्षा मुमताज बी बागवान यांना करण्यात आली.
निवेदनात शहरात जिनिंग अँड प्रेसिंग चे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचा चांगला भाव मिळत आहे. व शहरात मोठमोठी गोदामे असल्याने शासनाकडून मोठया प्रमाणात कापूस,ज्वारी, मका,तूर खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण झाला आहे. मात्र अनेक वेळा जिनिग मध्ये आग लागली असता आगीवर नियंत्रण आणण्यासाठी व आग विजवण्यासाठी जामनेर, भुसावळ, सावदा नगर पालिकेच्या अग्निशमन गाड्या पाचारण कराव्या लागतात. व अंतर मोठे असल्यांने त्यांच्या पोहचण्यासाठी वेळ लागत असल्याने तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. व बऱ्याच वळेस ग्रामीण भागात अग्नितांडावत अनेक कुटुंबांच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे.
तरी बोदवड परिसर दुष्काळी असल्याने पाण्याच्या अभावाने असल्या दुर्दैवी घटनांचा अटकाव करण्यास आपण नेहमी कमी पडलेले आहोत म्हणून नगरपंचायत ने अग्निशमन गाड्यांच्या मांगणीचे ठराव करून लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा व अग्निशमन गाड्या उपलब्द कराव्या अश्या मंगणीचे निवेदन नगरपंचायतिचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना देऊन माहितीसाठी प्रत आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, जिल्हाधिकारी जळगाव,तहसीलदार बोदवड यांना देण्यात आली.
निवेदन देतेवेळी शांताराम कोळी शिवसेना तालुका संघटक, हर्षल बडगुजर शिवसेना शहर प्रमुख,नगरसेवक सुनील बोरसे,नईम खान,गोपाळ पाटील,भास्कर गुरचळ,धनराज सुतार,पंकज वाघ, समीर शेख,कलीम शेख,उमेश गुरव,दीपक माळी उपस्तीत होते..