जळगाव- जीबी सिंड्रोम या आजारामुळे अंथरूणाला खिळलेल्या रूग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मेडीसीन तज्ञांनी केलेल्या उपचाराला यश आले आहे. या यशस्वी उपचारामुळे हा रूग्ण अवघ्या आठवडाभरात पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभा राहीला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल येथील गणेश सोनवणे (वय ४०) यांच्या हाता-पायाची ताकद अचानकपणे कमजोर झाली होती. हाता-पायाला मुंग्या देखिल येत होत्या. त्यामुळे त्यांना चालणे देखिल शक्य होत नव्हते. तसेच त्यांना बोलायला देखिल त्रास होत होता. अशा परिस्थीतीत गणेश सोनवणे यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी उपलब्ध असलेले निष्णात मेडीसीन तज्ञ डॉ. पाराजी बाचेवार यांनी गणेश सोनवणे यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. तपासणी अंती सोनवणे या रूग्णाला जीबी सिंड्रोमचा आजार असल्याचे निदान करण्यात आले. निदानानंतर सोनवणे यांना तातडीने भरती करण्यात आले. आठवडाभर या रूग्णावर उपचार करण्यात आले. अवघ्या आठवडाभरात सोनवणे यांच्यावरील उपचाराला यश आले. त्यामुळे अंथरूणाला खिळलेला हा रूग्ण पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभा राहीला. मेडीसीन तज्ञ डॉ. पाराजी बाचेवार यांनी अनुभवाच्या जोरावर रूग्णावर केलेलया उपचाराला यश आले. या उपचारासाठी डॉ. सारंग, डॉ. एकांश खरे यांनी सहकार्य केले.
रूग्णालय आणि डॉक्टर आमच्यासाठी देवदूत – गणेश सोनवणे
अचानकपणे हाता-पायाची ताकद कमी झाल्याने मला चालता येत नव्हते. डोळ्यासमोर मोठे संकटच उभे राहीले. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय माझ्यासाठी आशेचा किरण बनून आले. उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल झाल्यानंतर याठिकाणी डॉ. पाराजी यांनी तपासणी करून तातडीने उपचाराला सुरवात केली. उपचारादरम्यान रूग्णालयातील सुविधा आणि नर्स, स्टाफ यांच्याकडून कुटूंबाप्रमाणे वागणूक मिळाली. जशी परिवारातील सदस्याची काळजी घेतो तशीच काळजी रूग्णालयातील स्टाफने घेतली. डॉ. पाराजी आणि स्टाफने जागविलेला आत्मविश्वास आणि योग्य उपचारामुळे मी आज पुर्णपणे बरा झालो. हे रूग्णालय आणि डॉक्टर आमच्यासाठी देवदूतच असल्याचे गणेश सोनवणे यांनी सांगितले.