जळगांव दि.२१ – खान्देश कॉलेज एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांचा वतीने डाटा बेस मॅनेजमेंट या विषयासंबधित राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी एक आॅनलाईन प्रश्नमंजुषा घेतली गेली. या उपक्रमाला संपूर्ण भारतभरातुन भरगोस प्रतिसाद मिळाला. आय एम आर च्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांचा संकल्पनेतून हि राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा दि. २० मे २०२० रोजी घेण्यात आली. त्यासंबंधी बोलताना डॉ बेंडाळे यांनी सांगितले की या लाॅकडाउन परीस्थितीत विद्यार्थ्यांशी त्याच्या घरात लॅपटॉप किंवा काॅम्पुटर अथवा मोबाईलच्या माध्यमातून त्यांना उत्तेजन देणे आभ्यासक्रमाशी निगडीत ठेवणे. ज्याव्दारे विद्यार्थ्यांची रिव्हीजन होईल, आणि लाॅकडाउननंतर होणारी परीक्षा देण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास आबाधित राहिल. यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला आणि आमच्या या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा ही उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यामधील विविध जिल्ह्यामधील एकूण १५०० विद्यार्थ्यानी या संगणक प्रश्न मंजूषे मध्ये भाग घेतला. पुणे, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर, सातारा, पनवेल, मलकापूर, अक्रुडी, शेगाव, मलकापूर, संगमनेर, पिंपरी, अंबरनाथ, औरंगाबाद, नवी मुंबई या महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यानी या उपक्रमात सहभागी झालेत. पण महाराष्ट्र बाहेरील बिहार मधील पटणा, दरभंगा व मध्यप्रदेश मधील बुऱ्हाणपूर येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेतला . प्रश्नमंजुषा मध्ये विद्यार्थ्याचा डेटा बेस या विषय मधील प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नमंजुषा यशस्वी रीतीने पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना ईमेल द्वारेच त्वरित ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमात संगणक विभाग प्रमुख प्रा. तनुजा फेगडे, प्रा. प्रमोद घोगरे, राकेश राणे, प्रा. धनपाल वागुळदे, साधना थत्ते, यांनी संपूर्ण क्विझचे नियोजन, आयोजन सांभाळले. या उपक्रमाबद्दल देशभरातून विद्यार्थ्यांचेही अनेक उत्तम अभिप्राय संस्थेला प्राप्त झाले आहेत.