जळगाव, (विशेष प्रतिनिधी) – जळगाव वन विभागाच्या प्रवेशद्वारावर लावलेले सूचना फलक चर्चेचा विषय ठरत असून कोरोना संसर्ग वाढीचे कारण पुढे करत बाहेरून आलेल्या अभ्यंगताना भेटण्यास मनाई करण्यात येत असल्याचा प्रकार आज उजेडात आला. उपवनसंरक्षक यांना कुणीही भेटू शकत नाही असे सक्तीच्या सूचना शिपाई कर्मचाऱ्यांना दिल्याने जळगाव वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांना बाहेरून आलेल्या नागरिकांना भेटण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे या प्रकारामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांचा मनमानी कारभार समोर आला आहे.
वर्दळ असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अशी कुठलीही नोटीस नाही
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग काळात दररोज शेकडो सामान्य नागरिक विविध कार्यालयीन कामासाठी येत असतात तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे कार्यालय असो अथवा इतर आस्थापनांच्या प्रवेश द्वारावर नागरिकांना भेटण्या बाबत अशी नोटीस लावलेली नाही किंवा असा कुठलाही शासन निर्णय नाही. मात्र जळगाव वनविभागाच्या प्रवेशद्वारावर कोरोना संसर्ग वाढीचा प्रादुर्भाव सुरु असल्याने तो टाळण्यासाठी बाहेरच्या व्यक्तींना विना परवानगी व कामा व्यतिरिक्त कार्यालयात प्रवेश करू नये तसेच अत्यावश्यक काम असेल तर माक्स लावून व सुरक्षित आंतर ठेऊनच बोलावे असे आदेश उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी काढले असल्याची नोटीस प्रवेशद्वारावर लावलेली दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र शिपाई कर्मचारी यांना बाहेरच्या नागरिकांना कोणत्याही,कुठल्याही कामासाठी दालनात सोडू नये अशा सक्त सूचना / ताकीदच दिली आहे. या प्रकारामुळे जळगाव वनविभागाचा मनमानी पणा उघड झाला आहे.
संपूर्ण लॉकडाऊन काळात वनविभागाला अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवण्यात आले आहे. या कार्यालयाशी मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा फारसा संबंध येत नसल्याने या कार्यालयांमध्ये दैनंदिन वर्दळ देखील कमीच असते.याठिकाणी येणारा व्यक्ती संबंधित विभागाशी काहीतरी काम असल्याशिवाय वनविभागात शक्यतोवर येत नाही तरी देखील या कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर अशी नोटीस लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सूचना फलक काढणार – उपवनसंरक्षक
जळगाव वनविभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकाबाबत उपवनसंरक्षक यांना “दैनिक नजरकैद” ने विचारणा केल्या नंतर ते म्हणाले की काही लोक नाहक येत असतात अशा लोकांकरिता नोटीस लावली होती मात्र आता ती तात्काळ काढून घेण्यात येईल असे सांगितले.