दिल्ली,(वृत्तसंस्था)- सर्व जगाला कोरोना विषाणू अर्थात कोविड-19 ने वेठीस धरले असून गेल्या अनेक महिन्या पासून कोरोना विषाणू हा चीन ने निर्माण केला असल्याचा सर्वस्तरातून आरोप होत होता. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने या आरोपांचे खंडन करत कोरोना विषाणू नैसर्गिक असल्याचे जाहीर केले आहे.
चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला गुडघे टेकवायला भाग पाडले असून जगभर आर्थिक मंदीचे सावट आले आहे. लाखो लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. अद्यापही ठोस औषधं न निघाल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे संचालक माईकल यांनी कोरोना नैसर्गिक असल्याची माहिती दिली आहे.