वरणगावं(प्रतिनिधी):- वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी कर्मचारी यांना ppe kit मास्क व सँनीटायझर वाटप करण्यात आले.तसेच वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व नर्सिंग स्टाफ तसेच वरणगाव पोलीस स्टेशन यांचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांना पीपीई किट व मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे,नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे,माजी नगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, वैशाली देशमुख, जागृती बढे, गणेश धनगर, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवि सोनवणे, तसेच भाजपा शहर अध्यक्ष महेश सोनवणे,कौस्तुभ पाटील,वैभव महाजन सर्व कर्मचारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे हा सामूहिक कार्यक्रम संपन्न झाला.