चाळीसगाव (किशोर शेवरे) देशभरात कोरोना ने थैमान घातले आहे त्यामुळे खाजगी बाजारात ज्वारी मका व गहू कवडीमोल भावात विक्री होत आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्यामुळे आजच्या आपत्ती काळात हमीभाव केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल तरी तातडीने ज्वारी मका व गहू हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकर्यांच्या वतीने नामदार बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडे पत्राद्वारे व उप मुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार,तसेच छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा मंत्री, यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी ज्वारी मका व गहू हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.