पाचोरा,(पाचोरा)- तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय युवतीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शेतात घेऊन जाऊन बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार आज समोर आला असून युवतीने आरोपी सोनू उर्फ शरीफ मोहम्मद बागवान व शाहरुख खान फारुख खान दोघे रा. पाचोरा यांच्या विरुद्ध बलात्कार केल्याची फिर्याद दिल्याने पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी 19 वर्षीय युवतीने फिर्यादीत म्हटले आहे 26 रोजी रात्री 1 वाजता नागरदेवळा येथील फिर्यादीच्या राहत्या घरात व पाचोरा येथील अंतुर्ली जाणाऱ्या रोड जवडील शेतात नेऊन दोन्ही आरोपी यांनी जबरी संभोग केल्याची फिर्याद दिल्याने आरोपी विरुद्ध भादंवि कलम 376, 363, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करत आहे.