मुंबई,(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस बलात्कार,अत्याचाराच्या घटना वाढत असतांना मुंबईच्या ट्रॉम्बे येथून एका ६४ वर्षीय विधवा महिलेचा पाठलाग करून तीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून दोन ते तीन तरुणांनी एका वृद्ध विधवा महिलेवर बलात्कार करून तिला बेदम मारहाण करून मृत झाल्याचे समजून घटना स्थळावरून फरार झाले मात्र पीडित महिला बेदम मारहाण झाल्यामुळे बेशुद्ध झाली होती सध्या पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहिती नुसार,ईशान्य मुंबईतील ट्रॉम्बे येथे दोन ते तीन तरुणांनी ६४ वर्षाच्या विधवा महिलेचे पाठलाग करून अपहरण केले व तीला एका निर्जनस्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की , माझी आई सोमवारी रात्री कुर्ल्यातील नेहरुनगर जवळील श्री खंडोबा मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. तिथून किमान तीन जणांनी तिचा पाठलाग करून तिचं अपहरण केलं आणि ट्रॉम्बे येथील ठाणे खाडीजवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला, असं सांगितलं जात आहे.
आरोपीनीं पीडित महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, प्रायव्हेट पार्टवर तसेच शरीराच्या इतर अवयवांवर वार केले असून या मारहाणीमुळे ती त्या निर्जन खाडी परिसरातच घटनास्थळवर बेशुद्ध पडली होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.
मुलीच्या तक्रारीनुसार मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेनं विवस्त्र व रक्तस्राव होत असलेल्या पीडित महिलेला पाहिले असता सदर महिलेनं सर्वप्रथम पीडितेला घालण्यासाठी गाऊन दिला व त्यानंतर पोलिसांना कळवले.
या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणांस अटक केली असून, त्याच्या साथीदारांविषयी चौकशी केली जात आहे. पीडित महिला तिची मुलगी आणि नऊ वर्षाच्या नातवासोबत राहते. स्थानिक बाजारपेठेत मासे आणि झाडू विकून ती आपला उदरनिर्वाह करते अशी माहिती मिळत आहे.पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
















