Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय ; दोन्ही सभागृहात संमत १८ विधेयकांना संमती 

najarkaid live by najarkaid live
December 21, 2023
in राज्य
0
हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय ; दोन्ही सभागृहात संमत १८ विधेयकांना संमती 
ADVERTISEMENT
Spread the love

नागपूर, दि. २१: विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत 14 दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसांमध्ये कामकाज झाले. अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 12 मंजूर झाली. लोकायुक्त हे महत्त्वाचे विधेयक मंजूर झाले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. परंतु, तब्बल वर्षभरानंतर ते विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. याबरोबरच भ्रष्टाचार विरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर झाला. तसेच महाराष्ट्र वस्तू व सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी काही विधेयके देखील मंजूर झाली. एकही मिनिट वाया न घालवता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झाले. विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यातआले.

 

हिवाळी अधिवेशनात अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली. त्याचवेळी नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले. जेव्हा- जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आले, अवकाळी पाऊस, गारपीट आदीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली. कोणत्याही सरकारने केली नाही इतकी विक्रमी ४४ हजार कोटींची मदत गेल्या दीड वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली आहे. धानाचा बोनस वाढवून हेक्टरी १५ हजारांच्या ऐवजी २० हजार रुपये केला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल आणि बळी राजाला मोठा फायदा होईल. कांद्याची महाबँक आपण स्थापन करत आहोत. समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी ही कांद्याची महाबँक तयार करण्यात येणार आहे.

 

मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरु होती. सर्व सदस्यांनी अतिशय शांतपणे, संयमाने आपली मते मांडली. शासनाला सूचना केल्या. न्यायालयात टिकणारे आणि दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर आम्ही ठाम आहोत. एकीकडे भक्कमपणे न्यायालयात लढण्याची आमची तयारी आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्रे विहित कार्यपद्धती राबवून देण्याचे कामही सुरु आहे. फेब्रुवारीत आवश्यकता भासली, तर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील भरविण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला कुणबी नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचे दोन अहवाल शासनाला सादर झाले आहेत. दुसरा अहवाल तपासण्यासाठी विधी विभागाला पाठविला आहे.त्यानंतर त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे लोकाभिमुख सरकार आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे सरकार आहे. मराठा आरक्षणावर सरकार अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे सगळ्यांचे काम आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळाली पाहिजे, यावर आम्ही कायम आहोत. याप्रकरणी सुबोधकुमार यांची समिती स्थापन केली होती. त्यांनी अहवाल दिला असून त्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशनात निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या हिवाळी अधिवेशनात 55 हजार 520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष निव्वळ भार हा 48 हजार 384 कोटी 66 लाख रुपये एवढाच असणार आहे. पायाभूत सुविधा उभारणे, विविध विकास कामे यातून पूर्ण करण्यात येतील. वाढलेली महसुली व राजकोषीय तूट कमी करण्यासाठी उत्पन्न कसे वाढेल आणि खर्चावर कसे नियंत्रण ठेवता येईल ते पाहिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची वाढ होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी यावेळी सांगितले.

 

 

विदर्भातील 29 सिंचन प्रकल्पांना निधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाही नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी भरीव मदत केली आहे. धानाचा बोनस जाहीर केला आहे. विदर्भातील २९ प्रकल्पांना प्राधान्य देत निधी देण्यात आला आहे. तसेच विविध गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार कोटी विदर्भातील प्रकल्पांना देण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाला १५०० कोटी रुपये निधी दिला आहे. सरकारने विदर्भाचा प्रस्ताव मांडला, या प्रस्तावावर चर्चेदरम्यान समर्पक उत्तरे देत विदर्भाच्या विकासाचा आराखडा मांडला. सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. मराठा, धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

 

 

 

हिवाळी अधिवेशनात एकही तास वाया नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, गेल्या ३३ वर्षात घडले नाही असे यंदाचे अधिवेशन झाले. हिवाळी अधिवेशनात कामकाजाचा एकही तास वाया गेला नाही. अधिवेशन काळात सुमारे १०१ तास म्हणजेच ५ आठवड्यांचे कामकाज झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. दुधाला ५ रुपये प्रतीलिटर अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, धानाला १५ हजार ऐवजी २० हजार रुपये बोनस देणे असे निर्णय घेण्यात आले. ४३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्यात आले. अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेला एकही मुद्दा चर्चेविना राहिला नाही. मराठा समाजातील गरीबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे.

 

 

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2023 चे हिवाळी अधिवेशन

विधेयकांची यादी

पूर्वीची प्रलंबित विधेयके : 10

नवीन पुर:स्थापित : 17

एकूण : 27

दोन्ही सभागृहात संमत : 18

संयुक्त समितीकडे प्रलंबित 06

मागे घेण्यात आलेली विधेयके 03

एकूण 27

 

 

दोन्ही सभागृहात संमत विधेयक

(1) सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक. 48- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्ठता आणण्याकरीता)

(2) सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक.49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)

(3) सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक.45- महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, 2023. (गृह विभाग) (महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 याचे निरसन करण्यासाठी) (गृह विभाग)

(4) सन 2023 चे वि.स.वि.क्र. 51- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग) (5) सन 2023 चे वि.स.वि.क्र.47- महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2023. (गृहनिर्माण विभाग)

(6) सन 2023 चे वि.स.वि.क्र.46- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(7) सन 2022 चे वि.स.वि.क्र.36.- महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग) (8) सन 2023 चे वि.स.वि.क्र. 52 .- महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 (महसूल व वन विभाग)

 

 

 

(9) सन 2023 चे वि.स.वि.क्र.54.- महाराष्ट्र स्व्यं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण)

(10) सन 2023 चे वि.स.वि.क्र.-56 जी.एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ,पुणे, विधेयक 2023 (कौशल्य विकास व उद्योजकता)

(11) सन 2023 चे वि.स.वि.क्र.57.- जी.एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ, नागपूर, विधेयक, 2023 (कौशल्य विकास व उद्योजकता).

(12) सन 2023 चे वि.स.वि.क्र. 53.- महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग) (विद्यापीठाचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग)

(13) सन 2023 चे वि.स.वि.क्र. 50.- महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) विधेयक, 2023 (कृषी व प.दु.म विभाग)

(14) सन 2023 चे वि.स.वि.क्र.58.- महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(15) सन 2023 चे वि.स.वि.क्र.59.- महाराष्ट्र ललित कला शिक्षण मंडळ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण)

(16) सन 2023 चे वि.स.वि.क्र.60.- महाराष्ट्र विद्युत शुल्क (सुधारणा) विधेयक, 2023 (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)

(17) सन 2023 चे वि.स.वि.क्र 62.- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

(18) सन 2023 चे वि.स.वि.क्र. 61 .- युनिव्हर्सल स्किलटेक विद्यापीठ, वसई, विधेयक 2023. (कौशल्य विकास व उद्योजकता)

 

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1) सन 2023 चे वि.स.वि.क्र.34.- महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नौकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(2) सन 2023 चे वि.स.वि.क्र.40- महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023

(3) सन 2023 चे वि.स.वि.क्र.41- किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(4) सन 2023 चे वि.स.वि.क्र.42- बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5) सन 2023 चे वि.स.वि.क्र.43- अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,

(6) सन 2023 चे वि.स.वि.क्र.44.- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

मागे घेण्यात आलेली विधेयके

(1) सन 2023 चे वि.स.वि.क्र.18 .-महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

(2) सन 2022 चे वि.स.वि.क्र.37.- स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(3) सन 2023 चे वि.स.वि.क्र 21.- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)


Spread the love
Tags: #ajitdadapawar #ncp #mantralaynirnay#maharashtra #bjp #devendra fadanvis #mangesh chavhan #sharad pawar #राजकारण#CM Eknath Shinde
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा

Next Post

अधिवेशनात एकूण ७५८१ तारांकित प्रश्न प्राप्त त्यातील २४७ स्वीकृत झाले, तर ३४ प्रश्नांना उत्तरे

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
ओबीसी विभागासाठी पहिल्यांदाच ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद

अधिवेशनात एकूण ७५८१ तारांकित प्रश्न प्राप्त त्यातील २४७ स्वीकृत झाले, तर ३४ प्रश्नांना उत्तरे

ताज्या बातम्या

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

August 30, 2025
ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
Load More
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

August 30, 2025
ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us