मुंबई, – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषन्न करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं पोलीस प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करीत आहे.? असा प्रश्न राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.
बरं समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?
महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज तुटून का पडत नाहीयेत? त्यांना जाब का विचारला जात नाहीयेत? असे प्रश्न उपस्थित करून राज ठाकरेंनी उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन, सरकार व माध्यमांवर निशाणा साधला आहे.