नवी दिल्ली : पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी दोन दिवसांपूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले होते. परंतु दोघांनाही ग्रेटर नोएडा येथील परी चौकात थांबवून पुन्हा दिल्लीला पाठवले. तिथे राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की देखील झाली होती यामुळे देशभर काँग्रेस होतांना पाहायला मिळाली.
राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार आहेत. त्याबाबत इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, जगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून, त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून व त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यावाचून मला रोखू शकत नाही असे राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे. पीडित मुलीच्या परिवाराशी यूपी पोलीस व यूपी सरकार ज्या प्रकारचं वर्तन करत आहे, ते मला मान्य नाही. कोणत्याही भारतीयाने ती स्वीकारु नये असे देखील ट्विटर राहुल गांधींनी म्हटले आहे.
















