बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई
जळगाव – माणूस आपले आयुष्य जगताना स्वतःचे प्रतिबिंब इतरांवर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतो तो जसा आहे तसा इतरांना भासवितो, मात्र प्रत्यक्षात असे काही नसून सर्व आभासी असते, तुम्ही कसे आहात याचे खरे प्रतिबिंब स्वतःच्या मनाच्या आरशात डोकावून पाहिल्यावर तुम्हाला सत्य जाणवेल यामुळे भावी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी घडविण्यासाठी याप्रकारे करावा असे केसी ई चे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
केसीईच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे शुक्रवारी 28 रोजी झालेल्या उदघाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनावेळी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, शकुंतला माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. रंजना सोनवणे, प्रा. निलेश जोशी, प्रा दुष्यंत भाटेवाल उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. डॉ.रंजना सोनवणे यांनी केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. ईशस्तवन मोनिका सोलंकी तर स्वागतगीत शिल्पा बोरसे या विद्यार्थिनींनी सादर केले. यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. स्वाती चव्हाण यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे म्हणून मू. जे महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्याशी संवाद साधताना म्हटले की, दिव्याची वात म्हणजे शिक्षक आणि कापूर म्हणजे विद्यार्थी शिक्षकाचे काम म्हणजे विद्यार्थ्याला ज्ञानदान करून त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणे तर एकीकडे विद्यार्थी म्हणजे दरवरणाऱ्या कापुराप्रमाणे शिक्षणाचा, ज्ञानाच्या या धगधगत्या प्रवाहात स्वतःला त्यासाठी तयार करणे हे देखील महत्त्वाचे आहे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग भावी जीवनात विद्यार्थी घडविण्यासाठी करा,व या स्नेहसंमेलनाचा सोनेरी क्षण मनाच्या कुपीत राखून ठेवा असे विचार त्यांनी व्यक्त केले
शिक्षकाने स्वतःतला व्यासंग जोपासावा
प्राचार्य अशोक राणे यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हटले कि, पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या हेतूने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. आज या ठिकाणी उपस्थित सर्व भावी शिक्षकांनी स्नेहसंमेलनात उस्फूर्तपणे सहभागी व्हा, शिक्षण हे केवळ शिस्तीचे असणे महत्वाचे असले तरी ते तितकेच हसत-खेळत देखील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी स्वतातला व्यासंग जोपासला पाहिजे. यामुळे विद्यार्थी सर्व रुपी घडतो अध्यापनाच्या घटकांना जोडण्यासाठी स्नेहसंमेलन उपलब्ध करून दिले आहे .
ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा मी या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे गर्वाने सांगू इच्छिते, तुम्ही शिक्षक होणार आहात यासाठी स्वतःचे ध्येय निश्चित करा व त्यासाठी कसोशीने प्रयत्न करा आइन्स्टाइन हे जरी अभ्यासात हुशार नसले तरीही त्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत शोधून काढला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी एक कलागुण दडलेला असतो तो वेळीच हेरता आला तर यश नक्कीच मिळते असे असे राजश्री महाजन यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले सूत्रसंचालन सुजित चौधरी व तेजस्विनी वाणी तर आभार प्रा.शालिनी तायडे यांनी मानले. यावेळी प्रा. केतन चौधरी, प्रा. आर.सी.शिंगाने, प्रा.प्रवीण कोल्हे, प्रा.डॉ.सुनीता नेमाडे, प्रा. डॉ. एस. डी. भंगाळे, प्रा, अंजली बन्नपुरे आदी उपस्थित होते.















