Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वच्छ, सुंदर, हरित जळगावासाठी सज्जनशक्तीचा दृढ संकल्प

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाला शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांचा प्रतिसाद

najarkaid live by najarkaid live
February 24, 2023
in जळगाव
0
स्वच्छ, सुंदर, हरित जळगावासाठी सज्जनशक्तीचा दृढ संकल्प
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) –  स्वच्छता दूत, आठवड्यातून किमान एक तास स्वच्छतेसाठी, आपल्या परिसरातील विधायक काम करण्याऱ्या पाच व्यक्तींचे जनजागृतीसाठी एकत्रीकरण, स्वच्छता अभियान राबविणे, परिसरातील नागरिकांचे प्रबोधन, यातून जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वसमावेशक विचार करण्याचा दृढ संकल्प आज जळगावातील सज्जनशक्तींने केला.

महात्मा गांधीजीप्रमाणेच स्वच्छतेचा प्रचार प्रसार करणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 146 व्या जयंतीनिमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव  संकल्पना साकार करण्यासाठीची प्राथमिकस्तरावरील बैठक गांधीतीर्थ येथे आज संपन्न झाली. याप्रसंगी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी अशा ६० च्यावर स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची प्रमुख मार्गदर्शन केले.

शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो या दृष्टीने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे प्रस्ताव मांडण्यात आले. यात प्रत्येकाने स्वच्छता दूत या भूमिकेतून किमान एक वर्ष जोडावे, आठवड्यातील किमान एक  तास स्वच्छता विषयासाठी द्यावा. आपल्या परिसरातील किमान पाच व्यक्तींचा एक समूह तयार करून पुढील तीन महिन्यात घरापर्यंत स्वच्छतेविषयी प्रबोधन करावे. नगरसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी यांचेकडून स्वच्छता करून घ्यावी. परिसरातील प्लास्टिक कचरा एकत्रित गोळा करण्यासाठी एक दिवस उपक्रम राबविणे.

ज्या भागात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे, असे भाग शोधून त्या भागातील नागरिकांना प्रोत्साहनाच्या दृष्टीने एकत्रिकरण करणे असे प्रस्ताव ठेवण्यात आले. यावर साधक बाधक चर्चा होऊन सकारात्मकेतसह स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव, हरित जळगाव करण्यावर रूपरेषा ठरविण्यात आली.
गांधी रिसर्च फाऊंडेशन विधायक काम करित असताना समन्वयकाच्या भूमिकेत राहिल. वृक्षारोपणासह संवर्धन करत असतानाच स्वच्छतेच्या दृष्टीने जळगावात आज स्थिती काय आहे. समस्या कुठे आहेत, त्यावर उपाय करण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार झाला पाहिजे जेणे करून समस्येवर योग्य तोडगा काढता येईल. त्यादृष्टीने शाळा महाविद्यालयांपासून सामाजिक संस्था, व्यक्तींनी काम केले पाहिजे. आपला परिसर स्वच्छ करत असतानाच कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावावी. कुठेलेही अभियान राबविताना आरोग्याच्या दृष्टीने सजग राहिले पाहिजे. त्याबाबत जागरूकता करावी आपला वेळ देत असताना नागरिकांचा वेळ कसा विधायक कामांमध्ये लागेल यासाठी प्रयत्न करावे. विधायक कामातून प्रशासनावर चांगले काम करण्यासाठी दबाव आणला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

समाज व प्रशासन एकत्र येणार नाही तोपर्यंत जळगाव सुंदर होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ओला सुका कचरा वेगळा असेल तरच घ्यावा. सेवा नाही तर आपण स्वच्छतेची सवय लावू, कचऱ्याला कचरा म्हणून बघितले नाही तोपर्यंत स्वच्छता मोहिम यशस्वी होणार नाही. स्वच्छ वर्ग ही संकल्पना राबविण्याबाबतच्या सुचना उपस्थितांनी केल्या.

यावेळी बैठकीत प्रामुख्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, गिरीष कुळकर्णी, सुधीर पाटील, निवृत्त वनाधिकारी पी. आर. पाटील, आय. एस. रितापूरे, एनसीसीचे गोविंद पवार, डॉ. महेंद्र काबरा, वसीम पटेल,  दुर्गादास मोरे, राजेंद्र खोरखेडे, मुकेश कुरील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, मदन लाठी यासह शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व सामाजीक कार्यकर्ते आदी उपस्थीत होते. प्रास्ताविक व संचालन गिरीष कुळकर्णी यांनी तर आभार हेमंत बेलसरे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भवरलाल जैन यांच्या श्रद्धावंदन दिनी अनुभूती निवासी स्कूलतर्फे ‘भक्ती संगीत संध्या’ चे आयोजन

Next Post

राशिभविष्य 24 फेब्रुवारी:  या राशीच्या लोकांच्या नात्याला मिळेल नवी दिशा, पूर्ण होईल त्यांचे स्वप्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

राशिभविष्य 24 फेब्रुवारी:  या राशीच्या लोकांच्या नात्याला मिळेल नवी दिशा, पूर्ण होईल त्यांचे स्वप्न

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us