बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्स च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी असे रोहित पवार यांनी नुकतेच ट्विट केले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक नवा खुलासा करण्यात आला आहे. सुशांतची हत्या झाली नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असं एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला आपला अहवाल सोपावत म्हटलं आहे. यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करून सुशांतच्या मृत्यूचं भांडवल करणाऱ्यांना महाराष्ट्राची माफी मागावी असं म्हटलं आहे.















