Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनील महाजनांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक, महापालिकेसमोर केले निषेध आंदोलन

najarkaid by najarkaid
December 10, 2024
in जळगाव
0
सुनील महाजनांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक, महापालिकेसमोर केले निषेध आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जलशुद्धीकरण केंद्रातील पाईप, लोखंडी दरवाजे व खिडक्या आदी साहित्य चोरी प्रकरणातील मुख्यसूत्रधार मनपाचे माजी विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर तसेच माजी महापौर यांचे पती सुनील महाजन यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात करण्यात आली.

याप्रवृत्तीविरोधात भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जीएम फाउंडेशन येथून जळगाव शहर महानगरपालिकेपर्यंत निषेध व्यक्त करत घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.

मागील आठवडाभर माध्यमांतून जळगाव मनपाच्या मालकीच्या गिरणा पंपिंग, दापोरा पंपिंग व सावखेडा शिवारातील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाईप, लोखंडी दरवाजे व खिडक्या आदी साहित्य चोरीच्या बातम्या येत आहेत. या चोरल्या गेलेल्या मालमत्तेची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. या संदर्भात जळगाव तालु‌का पोलीस स्टेशन व रामानंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन गुन्हे दाखल असल्याचे कळते. धक्कादायक गोष्ट म्हणजे या चोरीच्या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार व संशयित आरोपी माजी महापौर पती व माजी उपमहापौर व विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन फरार असल्याचे समजते, म्हणून आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करत मनपाच्या मालकीच्या मालमत्तेच्या चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याच्या सूत्रधारास अटक करावी अशी मागणी सोमवार, ९ डिसेंबर रोजी आंदोलकांनी केली आहे.

यासह त्यांनी माजी विरोधी पक्षनेते सुनिल सुपडू महाजन हे फरार असल्याने तातडीने त्यांचा शोध घेवून अटक करावी. या गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून सर्व संबंधितावर योग्य ती कारवाई करावी. या गुन्ह्यातून अजून किती रकमेची व कोणती मालमत्ता आरोपीकडून चोरी केली गेली आहे हे जनतेसमोर आणावे. चोरी करणाऱ्या सर्व सदर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जीएम फाउंडेशन येथून जळगाव शहर महानगरपालिकेपर्यंत निषेध व्यक्त करत घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, जितेंद्र मराठे, अरविंद देशमुख, विशाल त्रिपाठी, भगत बालानी, दीपक सूर्यवंशी, मनोज काळे, गोपाल पोपटानि, सुनील सरोदे, वीरन खडके, गायत्री राणे, सुरेखा तायडे, आशिष सपकाळे, मुकुंद मेटकर, मुकुंदा सोनवणे, कैलास सोनवणे, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, शंकर कुमावत, राजेंद्र घुगे पाटील, उमेश देशपांडे, मिलिंद चौधरी, विनोद मराठे, नितीन पाटील, जितेंद्र मराठे, अजित राणे, नितीन पाटील, दीपक पुंडलिक, कैलास सोमानी, अशोक घाडगे, सदाशिव ढेकळे, धीरज वर्मा, मुविकोराज कोल्हे, भूपेश कुलकर्णी, राजेंद्र मराठे, बापू कुमावत आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन

Next Post

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us