मुंबई – राज्यातील राजकारणाला आणखी एक धक्का बसला असून सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
दरम्यान शनिवारी भाजपला सोबत घेत उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आली आहे. नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रीतसर नोटीस देण्यात आली असून यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.














