जळगाव – महावितरणच्या जळगाव परिमंडळात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता फारूख शेख, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, जयेश हिवाळे, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी जीवन बोडके, व्यवस्थापक (मानव संसाधन) उध्दव कडवे, सहाय्यक अनुदेशक युगंधरा राऊत, मुख्य लिपिक आरस्तोल पाटील, उच्चस्तर लिपिक (लेखा) शिवानी साळी यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज करोसिया यांनी परिश्रम घेतले.














