Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान… उन्हाळ्यात कुलर वापरतांना घ्या ही काळजी, अन्यथा….

najarkaid live by najarkaid live
April 24, 2023
in जळगाव
0
सावधान… उन्हाळ्यात कुलर वापरतांना घ्या ही काळजी, अन्यथा….
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तापमान वाढल्याने कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते. त्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे. त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये.

लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलरजवळ खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणावर बचत शक्य आहे.

कुलरबाबत माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. कुलरच्या प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कुलर पंप अधूनमधून बंद करावा. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. आपल्या दैनंदिन व्यापातून थोडासा वेळ या उपाययोजनांसाठी दिला तर कुलरमुळे होणारे विद्युत अपघात टळू शकतात. त्यामुळे आजच या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी काँग्रेससोबत गेलो असलो तरी हिंदूत्व अजिबात सोडणार नाही – उद्धव ठाकरे

Next Post

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us