जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे ,अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही , दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी,देशदूतचे अनिल पाटील ,सकाळचे संपादक राहुल रनाळकर ,डीडी बच्छाव , माहिती अधिकारी श्री. बोडखे , प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे , गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील,पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
दुचाकीस्वारांनी हेल्मेट हे वापरलेच पाहिजे. यामुळे आपले प्राण वाचण्यास मदत होईल . हेल्मेटशिवाय मी दुचाकी चालविणार नाही असा निर्धार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले. ते म्हणाले कि , हेल्मेट वापरताना सुरुवातीला अवघड वाटेल मात्र काही दिवसांनी याची आपणास सवय होईल . दुचाकी धारकांनी एमएसएम अर्थात मिरर ,साईड आणि वळण या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जवळपास ९० टक्के अपघात टाळले जाऊ शकतात . यासाठी हेल्मेट घातले पाहिजे असे आवाहनही श्याम लोही यांनी केले.
.यावेळी अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे , डीडी बच्छाव ,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आदींनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी तर सूत्रसंचालन शरद कुलकर्णी, नारायण पवार यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी वृत्तवाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, संतोष,नाजनीन शेख, भगवान मराठे, भूषण महाजन, स्वप्नील सोनवणे आदींनी परिश्रम घेतले .
हेल्मेटविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते . याचे उदघाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले . प्रत्येक पत्रकारांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अनिल केऱ्हाळे सपत्नीक सत्कार
बिकट परिस्थितीतही पत्रकारिता करून पत्रकारांमध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या टीव्ही नाईनचे पत्रकार अनिल केराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. धावपळीच्या युगात काम करताना उद्भवलेल्या आरोग्याच्या बिकट परिस्थितीत पत्नीने दिलेली खंबीर साथ यामुळे नव्याने मिळालेलं जीवन याची दखल महाराष्ट्र पत्रकार संघाने घेतली, त्यांचा यावेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला.