Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसमावेशक अाराखडा तयार करून गावाचा विकास साधावा

najarkaid by najarkaid
November 20, 2019
in जळगाव
0
सर्वसमावेशक अाराखडा तयार करून गावाचा विकास साधावा
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर- पाच वर्षासाठी जरी अापण सरपंच राहत असलो, तरी आपण कायमस्वरूपी गावात राहतो. त्यामुळे आपल्या गावाचा शाश्वत विकास व मूलभूत गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. यासाठी वेळप्रसंगी अहंकार बाजूला ठेवून सरपंचांनी ग्रामसेवकांना मदत करून कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन पंच संघटनेचे तालुका सचिव युवराज पाटील यांनी केले. 
‘आमचे गाव, आमचा विकास’ या अभियानांतर्गत शहापूर गणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ग्रामसेवक संघटनेचे सचिव युवराज पाटील बाेलत हाेते. या प्रसंगी जळांद्रीचे सरपंच चांगदेव पाटील, शेळगाव सरपंच निवृत्ती पाटील, शांताराम जाधव तसेच गणातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. या वेळी युवराज पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी विस्ताराधिकारी डी. एस. लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले. ते म्हणाले की, १४व्या वित्त आयोगाचे नियोजन ग्रामपंचायतींना करायचे असून एक वर्षांचा आराखडा दीडपट आधी बनवायचा आहे. व त्यापुढील पाच वर्षांचा आराखडा हा दुप्पट रकमेचा बनवायचा आहे. साधारणतः लोकसंख्येनुसार १४व्या वित्त आयोगाचा निधी आता उपलब्ध होणार अाहे. दरडोई म्हणजे माणशी ४०८ रुपये वार्षिक असा आराखडा असेल आणि याचे नियोजन करताना ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या तिप्पट समिती तयार करावी. मग त्यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्राम संसाधन सदस्य, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्ष, सीआरपी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य, सेवानिवृत्त शासकीय-निमशासकीय कर्मचारी, राज्य शासन व केंद्र शासनाचे सर्व कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश करावा. तसेच बाल सभा, महिला सभा यादीतून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करता येईल, याबाबत नियोजन करावे. , असे आवाहन लाेखंडे यांनी केले. या वेळी केंद्रप्रमुख अलका वानखेडे व मधुकर बहारे आदींनी मार्गदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कल्याणेहोळ प्राथमिक शाळा डिजिटल; विद्यार्थ्यांना अाधुनिक शिक्षण देणे शक्य

Next Post

राकेश पाटील मणीभाई शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित 

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
राकेश पाटील मणीभाई शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित 

राकेश पाटील मणीभाई शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us