बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांना सत्ता मिळविता आली नसली तरी राष्ट्रीय जनता दल (राजद)पक्षाला भाजपा पेक्षा अधिकच्या जागा मिळविण्यात यश मिळाल्याने बिहार निवडणुकीत ‘मोठा भाऊ’ ठरला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) भाजपाने ७४,जनता दलने (युनायटेड) ४३, विकास इंसान पार्टीने (व्हीआयपी) ४ आणि हिंदुस्तानी आम मोर्चाने (डब्ल्यूई) ने ४ जागा जिंकल्या.
महागठबंधन – आरजेडी ७५, कॉंग्रेस १९, माकप (एमएल) १२, माकप ०२,
इतर – एआयएमआयएम ०५, बीएसपी ०१, एलजेपी ०१, अपक्ष ०१ असा निकाल समोर आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा ७४ व राजद पक्षाला ७५ जागांवर विजय मिळविला आहे.
या निवडणुकांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांचा कस लागला होता तर विरोधी पक्ष असलेल्या महागठबंधनकडे अनुभवाचा परिणाम जाणवला तर लालू प्रसादही या निवडणुकीपासून दूर राहिल्याचा फरक जाणवला. तरी देखील तेजस्वी यादव यांनी आपली चमक दाखवल्याची चर्चा आहे. तेजस्वी यांच्या बिहार निवडणूकीच्या कामगिरी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कौतुक केले आहे.














