Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळं ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार!

najarkaid live by najarkaid live
October 30, 2019
in राज्य, राजकारण
0
सगळं ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सोबत राहण्यातच महाराष्ट्राचं हित आहे, असे नमूद करताना सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर राज्याला निश्चितच पाच वर्षे स्थिर सरकार मिळेल, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. यावेळी बोलताना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार, असे ते म्हणाले. त्याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत केले.
‘मुख्यमंत्रिपद’ आणि ‘ठरल्याप्रमाणे’ यावर आम्ही बोलत आहोत. येथे व्यक्ती नाही तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे १४५ हा बहुमताचा आकडा आहे तो कोणीही नेता वा आमदार या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी टोलेबाजीही राऊत यांनी यावेळी केली. सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्या राज्यपाल एखाद्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतीलही पण त्यांनाही बहुमत सिद्ध करावंच लागेल, असे राऊत म्हणाले. यावेळी महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार आहोत. या कुंडलीत कोणते ग्रह कुठे बसवायचे, कोणते तारे जमिनीवर उतरवायचे, कोणते चमकवायचे हे शिवसेना ठरवणार आहे, असे सांगत राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनाच किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला.

सध्या विधिमंडळ पक्षाच्या जोरदार बैठका सुरू आहेत. त्या एकदाच्या संपू द्या. शिवसेनेला कोणतीही घाई नाही. आता शांतपणाने, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि आम्ही ते निश्चितच घेऊ. त्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. आज शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ‘जे जे शक्य असेल ते सर्व करणार’, अशी भूमिका उद्धव यांनी घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल, असे विचारले असता, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील व जो आदेश देतील त्याचे पालन करणारे आम्ही सारे शिवसैनिक आहोत, असे राऊत म्हणाले. शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे चर्चेत असल्याबाबत विचारले असता अशा पुड्या सोडण्याची गरज नाही. शिवसेनेत अशी कुणाची नावे चर्चेत नसतात. येथे पक्षप्रमुखांच्या आदेशानेच सारे निर्णय होतात, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेचे २३ आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता हा आकडा कुठून आणला? मग ५७ आमदार संपर्कात आहेत असंच का नाही म्हणत, असा सवाल राऊत यांनी केला. आता तुम्ही पुडी सोडताय म्हणून मी सुद्धा पुडी सोडतोय. आज सकाळपासून भाजपचे साठेक आमदार आम्हाला संपर्क साधताहेत!, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली. याक्षणी महाराष्ट्रातील एकाही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, ही माझी खात्री असल्याचेही राऊत पुढे म्हणाले.
शिवसेनेने वेगळ्या पर्यांयांचा अद्याप विचार केलेला नाही. निकालादिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यावर शिवसेना ठाम आहे. भाजप-शिवसेनेत जे ठरलंय त्यानुसार सगळं काही व्हायला हवं. तसं लेखी आश्वासन भाजपने द्यायला हवं, एवढीच आमची मागणी असल्याचेही राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

Next Post

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us