Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in राजकारण
0
संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – सत्ताधारी भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून समविचारी घटक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू असला तरी या संभाव्य आघाडीवर बुधवारी मोठी नामुष्की ओढवली. मित्रपक्षांनी आपल्याला रास्त वाटा मिळण्याची मागणी ताणून धरल्यामुळे संभाव्य महाआघाडीचे जागावाटपावर बुधवारी सायंकाळपर्यंत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा तूर्तास रद्द करण्याची वेळ दोन्ही काँग्रेसवर ओढवली. अखेर युतीच्या धर्तीवर महाआघाडीतील जागावाटपाची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली जाईल, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मंत्रालयानजीकच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या संयुक्त महाआघाडीची घोषणा बुधवारी दुपारी तीन वाजता करण्यात येणार होती. त्यासाठी सर्व तयारी झाली. महाआघाडीच्या नावाचा फलक सेंटरच्या सभागृहात लावण्यात आला होता. ठरल्यावेळी पत्रकार आले. परंतु, महाआघाडी करण्यासाठी चर्चेला बसलेल्या नेत्यांचे एकमत होत नव्हते. चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच होते. सुरुवातीला तीन वाजता सांगितलेली पत्रकार परिषदेची वेळ दुपारी चार वाजता करण्यात आली. तरी तडजोड होऊ शकली नाही. नंतर ही वेळ सायंकाळी पाच वाजता झाली, पण जागावाटपाचा तिढा कायम होता. शेवटी पत्रकार परिषद झाली मात्र त्यात महाआघाडीचा तपशीलच नव्हता.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यशवंतराव चव्हाण केंद्रात ताटकळत बसलेल्या पत्रकारांना सामोरे गेले. ’काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कायम आहे. इतर छोट्या पक्षांचे जागावाटपावर अडले आहे. ती चर्चा आज पूर्ण होणार नाही. महाआघाडीचा निर्णय तुम्हाला जेव्हा होईल, तेव्हा कळवण्यात येईल’, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. तशीच गत आजच्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेची होती.
महाआघाडीच्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगळता स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, सपा, भाकप, माकप, जनता दल, बीआरएसपी, बविआ, पीआरपी असे नऊ छोटे पक्ष उपस्थित आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. तथापि सत्ताधारी पक्षातील बंडखोरांची दोन्ही काँग्रेस नेते तिकीट देण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महाआघाडीच्या नेत्यांचा दिवसभर मुंबईत ठिकठिकाणी बैठकांचा रतीब सुरू होता. सकाळी आघाडीच्या नेत्यांची बैठक विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी, तर दुपारी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पार पडली. त्यानंतर सायंकाळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मित्तल टॉवरमधील कार्यालयात खलबते झाली. पण, आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही सुटला नाही.
आझमींची जाहीर नाराजी
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी महाआघाडीच्या चर्चेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची मंडळी येथे चर्चा करतात; पण त्यांचे निर्णय दिल्लीतून होतात, असे आझमी म्हणाले. भाजप-शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी आपण 40 जागांवरून तीन जागांवर समझोता केला आहे. शिवाजी नगर मानखुर्द, भिवंडी पूर्व आणि औरंगाबाद पूर्व असे तीन मतदारसंघ आघाडीने समाजवादी पार्टीसाठी सोडले आहेत, असे आझमी यांनी यावेळी जाहीर केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपची 14 जणांची दुसरी यादी जाहीर

Next Post

एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

February 22, 2026
Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us