पाचोरा – येथे शुक्रवार दि. ९ रोजी अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे व खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होत असल्याने या निमित्ताने होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांचे अध्यक्षतेखाली पाचोरा – भडगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आली. या बैठकीस पी.टी.सी.चे चेअरमन संजय वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विजय पाटील (पाचोरा), तालुका अध्यक्ष संतोष जाधव (भडगांव), तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील (भडगाव), शहर अध्यक्ष सतिष चौधरी (पाचोरा), शहर अध्यक्ष शाम भोसले (भडगाव), महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सरला पाटील, योजना पाटील (भडगांव), न.पा. गटनेत्या सुचेता वाघ उपस्थित होत्या.
माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थानी आयोजित केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलीप वाघ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, राज्यातील युतीचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी झाले असल्याने शेतकरी, कामगार, युवक, महिला व व्यापाऱ्यांमध्ये या सरकारच्या धोरणांविषयी तिव्र नाराजी असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत विधानभवनावर आघाडीचा झेंडा रोवण्यासाठी व सुशासन देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रेचे आगमन दि. ९ रोजी होत असुन या निमित्ताने पारोळा व धरणगाव येथील सभा आटोपल्यानंतर शिवस्वराज्य यात्रा गिरड मार्गे पाचोरा येथे येणार आहे. यात्रेत विधानसभेचे नेते आमदार अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा अध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे गफ्फार मलिक, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, गुलाबराव देवकर, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे यांचे प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रेचे गिरड रोडवरील हनुमान नगर येथे आगमन झाल्यानंतर युवकांची मोटरसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथुन भुयारी मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन यात्रेचे सभास्थळी आगमन होईल. बैठकीस नगरसेवक भुषण वाघ, वासुदेव महाजन, अशोक मोरे, अॅड. अविनाश सुतार, शेतकरी संघांचे माजी सभापती प्रल्हाद पाटील, प्रा. माणिक पाटील, प्रा. मनिष बाविस्कर सह युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवस्वराज्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष विजय पाटील, संतोष जाधव (भडगांव), शहर अध्यक्ष सतिष चौधरी (पाचोरा), शाम भोसले (भडगाव) यांनी केले. बैठकीस नितीन तावडे, संजय वाघ, खलील देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.