Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं

najarkaid live by najarkaid live
November 4, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार सोनिया गांधींमध्ये होणार खलबतं
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली- राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून सुरू असलेला सावळा गोंधळ अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे नवं सरकार भाजपा-शिवसेनेचं येणार की नवीन आघाडीचा मुख्यमंत्री बसणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यात शिवसेनेकडून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच बळ त्यामाग आहे, अशीही एक चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल असून, जर भाजपा-शिवसेनेचं जमलं नाही. तर सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रसेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार दिल्लीत त्यांची भेट घेणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता असल्याचं ट्विट केलं होतं. त्याचबरोबर हुसेन दलवाई यांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. मात्र, सुशिलकुमार शिंदे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूमप यांनी विरोध दर्शविला आहे.

दुसरीकडं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विधान केलं होतं. विशेष म्हणजे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक सुरू असताना पक्षाचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मेसेज केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी याबाबत काहीही विधान केलेलं नाही. तर त्याअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला होता. पाठिंबा देणाऱ्याची पत्र असून, राज्यपालांना ती दाखवणार असल्याचंही म्हणाले होते. तसेच शरद पवार यांचीही राऊत यांनी निकालानंतर भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात नवं समीकरण आकाराला येत असल्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दिल्ली दरबारात गेला असून, मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेविषयी मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं आहे. तर शरद पवार हेही दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. भाजपा-शिवसेनेतील चर्चेची कोंडी फुटत नसल्यानं जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा का? यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकतं. २०१४ मध्ये राष्ट्रवादीनं भाजपाला सत्तास्थापनेसाठी न मागताच पाठिंबा दिला होता. त्यामुळे मराठीच्या मुद्दा आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला समर्थन देऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us