मुंबई : राज्यात सध्या अनेक कारणावरून राजकारण ढवळून निघत आहे. रोज कोणत्या न कोणत्या कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आता राजकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
कारण शिवसेनेचे मुंबईतील खासदार खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे.
मात्र, अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु आता यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.














