पाचोरा- शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ.सुनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला भर पावसात देखील कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.महिला सशक्तीकरण हीच उद्याच्या काळाची गरज असून सदर भावनेतूनच आशीर्वाद हॉल पाचोरा येथे आज सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी कार्यसम्राट आ.किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.गुलाबराव वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील,महिला जिल्हा संघटिका सौ.महानंदाताई,महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ.अंजलीताई नाईक, पाटील, तालुकाप्रमुख सौ.मंदाताई पाटील,भडगाव तालुकाप्रमुख सौ.सिमा ताई पाटील,उपतालुकाप्रमुख सुनंदाताई महाजन, शहरप्रमुख उर्मिला शळके शहरसंघटक बेबाताई पाटील, किरण ताई पाटील,उपस्थित होत्या.