Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवनेरी फाउंडेशन च्या सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण गावात आल्याने गुजरदरी येथील गावकरी भारावले 

najarkaid by najarkaid
June 8, 2020
in जळगाव
0
शिवनेरी फाउंडेशन च्या सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण गावात आल्याने गुजरदरी येथील गावकरी भारावले 
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (प्रतिनिधी)- “मिशन बिगीन अगेन” म्हणत शासन हळूहळू लॉकडाऊन उठवत परिस्थिती पूर्वपदावर आणत असताना मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षाचे गणित ठरविणाऱ्या खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतशिवारात कामांची लगबग सुरू झाली आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी घराबाहेर निघाल्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरीकडे मात्र या ना त्या मार्गाने कोरोना होण्याची भीती आहे अश्या वेळी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत येणाऱ्या परिस्थितीला तोंड देणे हाच पर्याय असल्याने चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटूंबाना केंद्र शासनाच्या आयुष् मंत्रालयाने सुचविलेले आर्सेनिक अल्बम -३० हे औषध घरपोच वाटप करण्यात येईल असा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक हात मागील १५ दिवसांपासून राबत आहेत त्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांचा पुढाकार महत्वाचा आहे.
आणि अखेर १ लाख आर्सेनिक अल्बम औषधी वाटप सुरुवात झाल्यानंतर ते औषध चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या घरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे ही खरी परीक्षा होती. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते जिल्हा परिषद गट निहाय प्रत्येक गावात औषधी किट पोहोचवत होते. मात्र चाळीसगाव शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर व डोंगर दऱ्यात वसलेले शेवटच्या टोकावरील गुजरदरी या गावात जाण्याचा निर्णय सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी घेतला, आज दि.८ जून रोजी त्यांनी सदर गुजरदरी गावात आर्सेनिक अल्बम – ३० औषध पोहोच केले.
तालुक्याच्या आमदारांच्या पत्नी आपल्यासाठी गावात आल्याने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. गावातील आशा सेविका व स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांना औषधी किट सुपूर्द केले. आमदारांच्या पत्नी प्रथमच आपल्या गावात आल्या म्हणून गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या शेतातील गावराणी आंब्याच्या कैऱ्या भेट म्हणून त्यांना दिल्या. निवडणुकीत मत मागायला देखील राजकारणी आमच्या गावात येत नाहीत मात्र तुम्ही कोरोनाच्या संकटात आमच्यासाठी औषधी घेऊन आलात म्हणून ग्रामस्थांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले. सौ.प्रतिभाताई चव्हाण देखील गावकऱ्यांनी केलेल्या स्वागतामूळे व आगळीवेगळी मिळालेली भेट पाहून भारावून गेल्या.
केवळ मतांपुरते नाही तर कायमचे ऋणानुबंध गुजरदरी गावाशी जोडले गेल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी सौ.भाग्यश्री घोंगडे, सागर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन औषधी वाटप

खरिपाचा हंगाम सुरू असल्याने खेडोपाडी शेती तयार करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग शेतात जात असल्याने सौ.प्रतिभाताई चव्हाण या गुजरदरी हुन चाळीसगाव येथे परतत असताना त्यांनी हिरापूर येथील जगदीश गंभीर निकुंभ यांच्या शेतात भेट दिली. शेतात महिलावर्ग धस काढत असताना सौ.प्रतिभाताई यांनी त्यांची विचारपूस करत त्यांना औषधी दिली. त्यानंतर तांबोळे बु./खु.,  चितेगाव येथे देखील आर्सेनिक अल्बम औषधी किट  ग्रामपंचायत सरपंच, आशा सेविका यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, निवृत्ती कवडे, भूषण पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

Next Post

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us