पारोळा – तालुक्यातील शिरसोदे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लीलाबाई शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे मीराबाई रतन भिल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर एकमताने लीलाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी उपसरपंच सुधाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयकुमार पाटील, सदस्या मीराबाई भिल, दिनकर बडगुजर, अनिल ठाकरे, अशोक महाजन, आशाबाई बाविस्कर, भारती पाटील, कमलबाई भोई आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गांगुर्डे यांनी काम पाहिले. तर ग्रामसेवक जितेंद्र बोरसे यांनी सहकार्य केले. याबद्दल आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सतीश पाटील, अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमोद जाधव आदींनी त्यांचे काैतुक केले अाहे. |