Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षण उपसंचालकांचे आदेश ; जळगाव जिल्ह्यातील ‘नऊ’ शिक्षकांची मान्यता रद्द ; चौकशी आदेशातून अनेक बाबी आल्या समोर

najarkaid by najarkaid
October 4, 2021
in Uncategorized
0
शिक्षण उपसंचालकांचे आदेश ; जळगाव जिल्ह्यातील ‘नऊ’ शिक्षकांची मान्यता रद्द ; चौकशी आदेशातून अनेक बाबी आल्या समोर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. जळगांव यांच्या बनावट सह्या स्कॅन करून पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार हायस्कूल  येथील ९ शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्याचे आदेश शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिकचे नितीन उपासनी यांनी दि.१ऑक्टोबर च्या पत्रान्वय दिले आहे.

उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त तक्रार अर्जानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगाव यांनी संदर्भ  2 च्या पत्रा नुसार सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा ता:- पाचोरा, जि:-जळगाव या शाळेतील 12 + 2 (12 अनुदानित व 2 विनाअनुदानित) शिक्षकांचा मान्यता बाबतचा तपासणी अहवाल सादर केला आहे. त्यानंतर या कार्यालयात दिनांक 25 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 30 सप्टेंबर रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली.

सदर द्वितीय सुनावणीस श्री डी. पी. महाजन, तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.)जि.प.जळगाव, श्री बी. जे. पाटील शिक्षणाधिकारी (माध्य.)जळगाव, श्री किशोर कृष्णराव पाटील संचालक ग्राम शिक्षण संस्था नगरदेवळा पाचोरा, जळगाव मुख्याध्यापक श्री. बोरसे व उपस्थित पत्रानुसार नमूद 5 शिक्षक उपस्थित होते उर्वरित शिक्षक अनुपस्थित होते.

सदर सुनावणीस उर्दू शाळेतील शिक्षक श्री अहेतेश्याम शेख अलाउद्दीन, श्री शेख जहांगीर शेख गुलाम गोस, शेख सादिक शेख बिस्मिल्ला,सरदार एस.के. पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा ता:-पाचोरा, जि:-जळगाव येथील (उर्दू) यांच्या मान्यतेबाबत तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. जळगाव, श्री डी. पी. महाजन यांनी त्यांना अभिप्राय बाबतचे पत्र मिळाले नसल्याचे नमूद केल्याने त्यांना सदर पत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्या पत्रानुसार श्री महाजन यांनी उपरोक्त 3 मान्यता आदेशावर त्यांची स्वाक्षरी आहे किंवा कसे?याचा अहवाल सात दिवसात या कार्यालयात सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा निर्णय देण्यात येईल. तो पावेतो सदरच्या तीन मान्यता आदेशांना स्थगिती देण्यात येत आहे.

श्रीमती संगीता वना मोरे व सौ मनीषा अर्जुनसिंग परदेशी यांची नियुक्ती विनाअनुदानित तत्त्वावरील असून त्यांना विनाअनुदानित कडून अनुदानित पदावर बदलीने नियुक्तीस मान्यता श्री बी.जे.पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. जळगाव यांनी दिलेली आहे चौकशीत शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना विनाअनुदानित कडील तुकडी मान्यता ते सादर करण्यास नमूद केले असता त्यांनी सदर आदेश शाळेत विनाअनुदानित तुकडी कार्यरत नसल्याचे निवेदन दिले.

शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. जळगाव यांच्या संदर्भात दोन च्या अहवालानुसार तसेच मुख्याध्यापकांच्या निवेदनानुसार उपशिक्षक 1)श्रीमती अंजली भास्कर पाटील 2)श्रीमती राणी ज्ञानेश्वर पाटील 3)श्रीमती शैला आनंदराव साळुंके 4)श्रीमती ललिता श्रावण पाटील 5)श्री राहुल परेश परदेशी 6)श्रीमती अनिता चंद्रकांत ठाकरे 7)श्री प्रेमनाथ  तानाजी भोसले 8) श्री सौरभ लक्ष्मीनारायण तोष्णीवाल 9) श्री यजुर्वेदसिंग वनीलसिंग राऊळ हे सदर शाळेत कधीही उपशिक्षक पदावर कार्यरत नव्हते. तसेच संबंधितांच्या उपशिक्षक म्हणून दिलेल्या मान्यता आदेश श्री महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी त्यांची स्वाक्षरी नसल्याचे नमूद केल्याने व त्याबाबत त्यांनी लेखी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यास कळविलेले असल्याने सदर मान्यता अवैध असल्याचे सिद्ध होते.

या नऊ शिक्षकांच्या मान्यता रद्द….

दरम्यान चौकशी अहवालानुसार मुख्याध्यापक यांनी अनुक्रमांक 1 ते 9 नमूद उपशिक्षक यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर शिक्षक कार्यरत नसल्याने तसेच त्यांनी सक्षम अधिकारी यांच्याकडून सदरच्या मान्यता घेतल्या नसल्याने श्रीमती अंजली भास्कर पाटील,श्रीमती राणी न्यानेश्वर पाटील, श्रीमती शैला आनंदराव सोळंखे, श्रीमती ललिता श्रावण पाटील,श्री तानाजी भोसले, श्री राहुल परेश परदेशी, श्री सौरभ लक्ष्मीनारायण तोष्णीवाल, श्रीमती अनिता चंद्रकांत ठाकरे,श्री यजुर्वेंद्रसिंग वनिलसिंग राऊळ, या ९ शिक्षकांच्या मान्यता पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.

विना अनुदानित तुकडीवर 2 मान्यता श्री बी. जे.पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. जळगाव यांनी दिलेली आहे. चौकशीत शिक्षणधिकारी व मुख्याध्यापक यांना विना अनुदानित कडील तुकडी मान्यता आदेश सादर करण्याचे नमूद केले असता त्यांनी सदर शाळेत विना अनुदानित तुकडी कार्यरत नसल्याचे निवेदन दिले.शिक्षणधिकारी यांनी सदर मान्यतेबाबत संचिका व आदेश पडताळणी करिता ७ दिवसाची मुदत मागितली असल्याने त्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सदर शाळेत विना अनुदानित तुकडी कार्यरत नसल्याचे लक्षात घेता सदरच्या दोन मान्यता स्थगित करण्यात येत असून शिक्षणधिकारी यांच्या सुधारित अहवाल ७ दिवसाच्या आत सादर केल्यानंतर निर्णय देण्यात येईल तोपर्यंत सर्व एकूण ५ मान्यता आदेशांना पुढील निर्णय देण्यात येईल तो पावेतो स्थगिती देण्यात येत आहे असे आदेश नाशिक विभाग नाशिकचे शिक्षण उपसंचालक यांनी आदेश दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर ; पहा काय आहेत?

Next Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा मिळेल ; जाणून घ्या

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
पोस्टाच्या ‘या’ योजनेत एका वर्षात बँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल, जाणून घ्या

पोस्टाच्या 'या' योजनेत बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा मिळेल ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us