- पोलिस महासंचालकांसह इतरांना बजावली कारणे दाखवा नोटीस
जळगांव- गेल्या 2 वर्षापासुन नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडा गर्दी करुन दहशत माजविणारे देशी दारु दुकान चालक विजय भास्कर पाटील, पियुष पाटील व त्याचे गांवगुंड सहकारी यांनी प्राचार्य, कर्मचारी, सुरकक्षारक्षक यांच्यावर हल्ले करुन दहशत माजवली आहे. या संदर्भात पोलिस प्रशासन जिल्हा पेठ तसेच विविध घटकांकडे या बाबत न्याय मिळण्यासाठी मागणी करुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती. म्हणुन मे. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्र. 720/19 दाखल करण्यात आली होती. सदर याचीकेत याचिकाकर्ता पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी या गावगुंडां विरुध्द अनेक पुरावे सादर केले होते. नुतन मराठा महाविद्यालय आवारात गुंडागर्दी करण्यासह जिल्हा पेठ पोलिस प्रशासनातील पोलिस कर्मचाऱ्यांवर ह्या गुन्हेगारांची हात उचलण्या पर्यंतची मजल गेली असल्याचे पुरावे मे. उच्च न्यायालयात सादर केले असता या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे पोलिस महासंचालकांसह पोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक, पोलीस अधिक्षक जळगांव, पोलीस निरीक्षक जिल्हापेठ जळगांव, यांना मे. उच्च न्यायालयाने तातडीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या संदर्भात दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती मे. उच्च न्यांयालयाचे वकील ॲड. हेमंत सुर्वे यांनी माहिती दिली. त्यामुळे दि.27/07/2019 रोजी काही पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी मानद सचिव निलेश भोईटे व संचालक मंडळ यांच्याशी चर्चा केली असता न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल याचा विचार करुन विद्यार्थीहित लक्षात घेता 29 रोजी होणारा भव्य मोर्चा तुर्तास स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच मविप्रच्या मुख्याध्यापीका, दोनविद्यार्थीनी व काही कर्मचारी यांच्या संदर्भात असलेले शारीरक मानसिक तसेच विनयभंग सारख्या तक्रारी बाबत कर्मचायांचे शिष्टमंडळ तयार करुन पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून या तक्रारीचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.अशी माहिती पुण्यप्रताप दयाराम पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय दिली आहे.