जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी मुसळधार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणातील जलसाठ्यात गेल्या दोन दिवसात चार टक्क्याने वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा ३४ टक्क्याने कमी आहे.
दोन दिवसापूर्वी जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून होऊ लागले आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ६१. ५८ टक्के असलेला साठा गुरुवारी सकाळी ६५.४४ टक्के नाेंदवला गेला अाहे.